मुंबईतील २४ हजार वृक्षांची छाटणी पूर्ण

मुंबईतील २४ हजार वृक्षांची छाटणी पूर्ण

वृक्षांच्‍या पडझडीतून सुटका
मुंबईतील २४ हजार ७६ झाडांची छाटणी

वृक्षांच्‍या पडझडीमुळे मुंबईत अनेक दुर्घटना होत असतात. त्‍या टाळण्यासाठी पालिकेचा उद्यान विभाग सज्‍ज झाला आहे. पावसाळापूर्व कामांना वेग आला असून धोकादायक ठरू शकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटणीची कामे वेगाने सुरू आहेत. आतापर्यंत २४,०७६ झाडांची छाटणी झाली असून ३१ मेपर्यंत उर्वरित ६१,४२९ झाडांची छाटणी पूर्ण करण्यात येणार आहे.

पालिकेच्या उद्यान विभागाने यंदा मुंबईतील एकूण ८५,५०५ झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट समोर ठवले आहे. यापैकी आतापर्यंत २४,०७६ झाडांची छाटणी झाली आहे. त्‍यामुळे मुंबईकरांना यंदा झाडांच्‍या पडझडीच्‍या घटनांपासून दिलासा मिळेल, अशी आशा व्‍यक्‍त केली जात आहे.
पालिका क्षेत्रात वेगवेगळ्या खात्यांमार्फत पावसाळापूर्व कामे करण्यात येत आहेत. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही सर्व पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश सर्व संबंधित खात्यांना दिले आहेत. २०१७ मध्ये झालेल्या वृक्षगणनेनुसार महापालिका क्षेत्रात सुमारे २९,७५,२८३ झाडे आहेत. यापैकी १५,६३,७०१ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत; तर ११,२५,१८२ एवढी झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी १,८५,९६४ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. रस्त्यांच्या कडेला असलेल्या झाडांचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करून छाटणीची कामे निश्चित करण्यात येतात. जी झाडे लहान असतात व ज्यांचा कोणताच धोका नसतो, अशांचा सर्वेक्षणात विचार केला जात नाही. उद्यान विभागाने यंदा मुंबईतील आकाराने मोठ्या अशा सुमारे १,१५,११४ वृक्षांचे सर्वेक्षण केले. त्यात रस्‍त्‍यांच्‍या कडेला असलेल्या सुमारे ८५,५०५ झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करण्याचे निश्चित करण्यात आले. यापैकी आजपर्यंत २४,०७६ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्‍यात आली‍ आहे; तर ३१ मेपर्यंत उर्वरित ६१,४२९ झाडांची छाटणी पूर्ण करण्याचे उदिष्ट उद्यान विभागाने ठेवले आहे. महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांमध्ये या कामी यंत्रसामग्री, मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे. त्याचप्रमाणे खासगी गृहनिर्माण संस्थांनी महानगरपालिकेची पूर्वपरवानगी घेऊन झाडांची सुयोग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी करावी, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

या गोष्‍टींकडेही लक्ष
मृत असलेल्या झाडांचे निर्मूलन, धोकादायक असलेल्या झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांचे निर्मूलन, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांच्या ढोली व पोकळ्या भरणे, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व झाडांची मुळे- खोड तसेच पानांवर कीटकनाशकांची फवारणी करणे आदींचा समावेश आहे.

मुंबईतील झाडांची आकडेवारी
२०१७ मधील वृक्ष गणनेनुसार
२९,७५,२८३ झाडे
१५,६३,७०१ खासगी संस्थांच्या आवारांमध्ये
११,२५,१८२ शासकीय आस्थापनांच्या परिसरामध्ये
१,८५,९६४ रस्त्यांच्या कडेला

यंत्रणा सज्‍ज
महापालिकेच्‍या सर्व २४ विभागांमध्ये या कामी यंत्रसामुग्री, मनुष्‍यबळ उपलब्‍ध आहे. त्याचप्रमाणे खासगी गृहनिर्माण संस्थांनी महापालिकेची पूर्वपरवानगी घेऊन झाडांची सुयोग्य छाटणी पावसाळ्यापूर्वी करावी, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com