कल्याण, डोंबिवलीत मंगळवारी पाणीबाणी

कल्याण, डोंबिवलीत मंगळवारी पाणीबाणी

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी मंगळवारी (ता. ३) १२ तासांसाठी महापालिकेचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बारावे, मोहिली व टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून महापालिका क्षेत्रातील कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, वडवली, शहाड व टिटवाळा परिसरात पाणीपुरवठा होतो. ३ मे रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत या भागाला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com