नागला बंदर किल्ला नामशेष

नागला बंदर किल्ला नामशेष

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : घोडबंदर रोडवरील खाडी किनारी ऐतिहासिक नागला बंदर किल्ला आहे. या किल्ल्याला लागून असलेल्या डोंगरावर काही भूमाफियांकडून क्रशर मशीन लावून अवैधरित्या खाणकाम सुरू आहे. पुरातत्त्व खात्याच्या संचालनालयामार्फत नागला बंदर किल्ल्याची पाहणी करण्यात आली आहे. नागला बंदर किल्ला हा नामशेष झाला असून तेथे मोठ्या प्रमाणात खाणकाम व रेतीकाम करण्यात येत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

राज्यातील गड-किल्ले सुस्थितीत आणण्यासाठी आणि त्यांची निगा, देखभाल करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात असलेल्या घोडबंदर किल्ल्याचे अस्तित्व टिकून आहे. अशातच या ऐतिहासिक नागला बंदर किल्ल्याला लागून असलेल्या डोंगरामध्ये स्थानिक भूमाफियाने खडी क्रशर मशीन लावून अवैधरित्या खाणकाम करत आहे. नागला बंदर किल्ल्याची आसपासची जमीन एका भूमाफियाने ताब्यात घेऊन कोणतीही परवानगी न घेता हा किल्ला असलेला डोंगर पूर्णपणे तोडायला घेतला आहे. त्या ठिकाणी खडी क्रशर मशीन बसवण्यात आली असून या डोंगरावरील दगड तोडून दगड व त्याचा भुसा सर्रासपणे विकला जात आहे.

या भूमाफियांवर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच अवैधरित्या नागरी वस्तीत सुरू असलेल्या दगडखाणी बंद करण्यात याव्यात, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

किल्ल्याचे अवशेष गायब
ज्या ठिकाणी किल्ला होता, त्या ठिकाणी फक्त भग्न अवस्थेतील दोन भिंती असून त्या भिंतींवरच खडी क्रशरसाठी लागणारे साहित्य व भंगार सामान ठेवल्यामुळे किल्ल्याचे भग्न अवशेषही त्या ठिकाणी दिसत नाहीत.

नागरिकांना त्रास
पर्यावरण खात्याचे कुठल्याही नियमांचे पालन न केल्यामुळे त्या ठिकाणी व आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात धूर व धुळीचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे व श्वसनाचा त्रास होणे, अशा अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com