वाड्यात मुलांचे रिक्षातून वाजत-गाजत स्वागत

वाड्यात मुलांचे रिक्षातून वाजत-गाजत स्वागत

वाड, ता. २९ (बातमीदार) : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत भारत सरकारच्या निपुण भारत प्रकल्प अंतर्गत राज्यात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे. तसेच स्टार्स प्रकल्प (स्ट्रेंथनिंग टीचिंग-लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेटस प्रोजेक्ट) अंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल उपक्रम राबवण्यात येत आहे. याच अनुषंगाने वाडा तालुक्यात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी मेळावा क्र. १ चे आयोजन करण्यात आले होते. मुसारणे येथे सरपंच राजश्री सातवी व केंद्रप्रमुख नितीन जव्हारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. फुगे, फुले, हार घालून सजवलेल्या रिक्षातून, वाजतगाजत बालकांची प्रभातफेरी काढण्यात आली. सरपंचांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्‍घाटन करण्यात आले. बालकांचे औक्षण करण्यात आले. तसेच बालकांचे पहिले पाऊल कायम लक्षात रहावे यासाठी त्यांच्या पावलांचा ठसा घेण्यात आला. माता व बालक दोघांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक पिनेश जाधव व सहशिक्षक रमेश शिंदे यांनी सर्व प्रमुख पाहुणे, ग्रामस्थ व पालक यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com