पारोळ ते तुंगारेश्वर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करा

पारोळ ते तुंगारेश्वर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करा

विरार, ता. २९ (बातमीदार) : पारोळमार्गे तुंगारेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता वळणाचा आहे. तसेच या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शिरसाड-वज्रेश्वरी रोड पारोळ ते तुंगारेश्वर देवस्थान व्हाया परशुराम कुंड हा रस्ता चिऱ्याच्या दगडापासून तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी बोईसरचे आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री गुरुवारी (ता. २६) तुंगार पर्वतावरील परशुराम कुंड येथील बालयोगी श्री सदानंद महाराज आश्रमाच्या वार्षिक कार्यक्रमास आले असताना आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना मागणीचे निवेदन सादर केले.
आमदार राजेश पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोईसर विधानसभा मतदारसंघात असलेल्या वसई तालुक्यातील तुंगारेश्वर डोंगरावर तुंगारेश्वर देवस्थान व बालयोगी श्री सदानंद महाराज यांचा आश्रम असल्याने वसई तालुक्यातीलच नाही तर तालुक्याबाहेरील भाविकांची व पर्यटकांची वर्दळ असते. पारोळ ते तुंगारेश्वर हा रस्ता वळणावळणाचा व खूप अडचणींचा आहे. तसेच अतिवृष्टीमुळे हा रस्ता खूपच खराब झाला असल्यामुळे या मार्गाने भाविकांची खूप गैरसोय होत आहे. त्यामुळे पारोळ ते तुंगारेश्वर देवस्थान व्हाया परशुराम कुंड हा रस्ता चिराच्या दगडापासून तयार करण्यासाठी अंदाजे १५ ते २० कोटींचा निधी उपलब्ध करून सहकार्य करावे, अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com