देशाची ‘मन की बात’

देशाची ‘मन की बात’

देशाची ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी कुशल संवाद आणि जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या अद्वितीय कौशल्यामुळे आज जगातील लोकप्रिय नेत्यांच्या यादीत सर्वांत वरच्या स्थानावर आहेत. सर्व वयोगटातील लोकांपर्यंत योग्य तो संदेश पोहोचवण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्यात आहे.
मोदी यांनी संवादासाठी वापरलेल्या अभिनव पद्धतींमध्ये दर महिन्याला प्रसारित होणारी ‘मन की बात’ ही आहे. कोट्यवधी श्रोते रविवारच्या (ता. ३०) ऑल इंडिया रेडिओवर या मासिक प्रसारणाच्या शंभराव्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मोदी यांच्या संवादाच्या या कलात्मक पद्धतीने गेल्या काही वर्षांत लोकप्रियतेचे सर्व मापदंड मागे टाकले आहेत.
पूर्वीच्या रामायण, महाभारत मालिकांचे आकर्षण आणि क्रेझ लोकांमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी पाहायला मिळते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा असा संवाद सेतू आहे ज्यामध्ये आजपर्यंत कधीच समाजासमोर न आलेले अनेक शूर सुपुत्र सहभागी होतात. अशा अज्ञात नायकांच्या कथा ऐकण्याचा थरार लोकांना फार आवडतो, ही खऱ्या अर्थाने देशातील प्रत्येकाच्या मनातील गोष्ट आहे. यातून पंतप्रधान आणि सामान्य जनता यांच्यात विलक्षण नाते तयार झाले आहे.
‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, हुंडाविरोध, महिला सक्षमीकरण, व्यसनमुक्ती, कला, संस्कृती, अवयवदान, जलसंधारण असे व्यापक प्रश्न मांडून लोकांना जागरूक केले आहे. तसेच लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीवही करून दिली आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा संवाद अराजकीय स्वरूपाचा आहे. त्यांच्या भाषणातील मुख्य मुद्दे लोकसेवा आणि जनहित हे आहेत. यातून दोन गोष्टी शिकता येतात, जर आपल्याला राजकीय यश मिळवायचे असेल, तर आपल्याला लोकांच्या भावना समजल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे संवादाचे माध्यम, इंटरनेटच्या काळातही जुन्या रेडिओसारख्या माध्यमाचा वापर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झाले आहेत. हेच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे.

आचार्य पवन त्रिपाठी
भाजप, मुंबई, उपाध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com