ई-शिवनेरीचे १ मे रोजी लोकार्पण

ई-शिवनेरीचे १ मे रोजी लोकार्पण

मुंबई, ता. २९ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य सरकारच्या वतीने १ मे रोजी एसटी महामंडळाच्या विविध योजनांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यात मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पहिल्या इलेक्ट्रिक शिवनेरी बसचे लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असेल. एसटीच्या सदिच्छा राजदूताची घोषणा, स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाचा शुभारंभ, एसटीच्या लघुपटाचे प्रदर्शनही या वेळी केले जाणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली. कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अरविंद सावंत, परिवहन प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com