भिवंडीत इमारत कोसळली

भिवंडीत इमारत कोसळली

भिवंडी, ता. २९ (बातमीदार) ः तालुक्यातील वळ गावात माणकोली-वसई महामार्गावर असलेल्या वर्धमान कंपाऊंडमधील मे. एम. आर. के. फुड्स या गोदामांची तीन मजली इमारत आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. यात मलब्याखाली अनेक जण दबले असून नऊ जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. अंदाजे २२ कामगार व रहिवासी अडकले असल्याची शक्यता असून इमारतीचा मलबा काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
सायंकाळी ७ वाजेपर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढले असून बाहेर काढलेल्या इतर कामगारांपैकी पाच जण जखमी असून त्यांच्यावर शहरातील इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवनाथ रंगनाथ सावंत (वय ४१) व ललिताबेन रवीकुमार महंतो (वय २६) अशी मृतांची नावे आहेत. मुख्तार मन्सुरी रोशन शेख, विकास मुकेश राजभर व उदय बहेर यादव यांच्यासह प्रिंस कुमार (वय ५) व प्रेमकुमार (वय ७) ही दोन लहान मुले जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोन्ही मुले मृत ललिताबेन यांची असून मुलांचे वडील बाहेर गेल्यामुळे बचावले.
इमारत १० वर्षांपेक्षा जास्त कालावधीची असून जखमी तीन जण या इमारतीमध्ये हमालीचे काम करीत होते.
इमारतीच्या तळ आणि दोन मजल्यांवर खाद्यपदार्थांची गोदामे होती. टेरेसवर पत्र्याची शेड टाकून तिसरा मजला कामगारांना राहण्यासाठी बनवला होता. आज सकाळी खाद्यपदार्थाचे बॉक्स घेऊन तीन कंटेनर आले होते. त्यामधील बॉक्स खाली करीत असताना अचानकपणे ही दुर्घटना घडली. ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकूण नऊ रहिवाशांची सुटका केली.
...
मलबा हटवण्याचे काम सुरू
घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाचे काम सुरू आहे. प्रांत अधिकारी, भिवंडीचे तहसीलदार, ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ग्रामसेवक, पोलिस उपायुक्त, पोलिस कर्मचारी, शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान कार्यरत आहेत. इमारतीमधील मलबा दूर करण्याचे काम रात्रभर सुरू राहील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com