द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचा १०५ वा वर्धापनदिन

द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेचा १०५ वा वर्धापनदिन

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २९ : कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे याकरिता काही चित्रकार आणि शिल्पकारांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्था यंदा १०५ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. ठाण्यातील हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे हा सोहळा होणार आहे.
रविवारी महाराष्ट्रातील अनेक नामवंत कलाकार या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. चित्रकार वासुदेव कामत, विजय आचरेकर, अक्षय पै, अभिषेक आचार्य, निशिकांत पालांडे यासह तरुण कलावंताचा ‘ग्रुप पॉलिटिकल’ हा समूह या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. सोमवारी सुरभी गुळवेलकर, स्नेहल पागे आणि निलिशा फड या तीन दिग्गज महिला कलाकारांसोबत समृद्ध महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा कलेतून सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात नामवंत कलाकारांचे कला प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com