चिंचपाडा येथे लक्झरी बसला आग

चिंचपाडा येथे लक्झरी बसला आग

कासा, ता. २९ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कासा पोलिस ठाणे हद्दीत चिंचपाडा येथे चालत्या लक्झरी बसला आग लागली.
शॉर्ट सर्किटने ही आग लागल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. या दुर्घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली असून, कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. शनिवारी रात्री सव्वानऊ वाजण्‍याच्या दरम्यान चिंचपाडा येथील वेलकम धाब्यासमोर लक्झरी बसने पेट घेतला. चालकाने सतर्कता दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले. बघता बघता लक्झरी बस पूर्ण जळून खाक झाली. घटनास्थळी पोलिस प्रशासन, महामार्ग पोलिसांनी पोहचून वाहतूक कोंडी सोडविण्‍यास मदत केली. लक्झरी बस अहमदाबाद ते हैद्राबादला जात होती. यात १४ प्रवासी व तीन वाहनचालक प्रवास करीत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com