अल्पदरात वैद्यकीय सेवा, सुसज्ज अभ्यासिका

अल्पदरात वैद्यकीय सेवा, सुसज्ज अभ्यासिका

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थान यंदा आपले शतकमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ८ मेपासून या शतकमहोत्सवी वर्षाची सुरुवात होत असून या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी डोंबिवलीकरांना मिळणार आहे. सांस्कृतिक उपक्रमांसोबत सामाजिक कार्यात संस्थानचा मोठा हातभार असून येत्या वर्षभराच्या कालावधीत नागरिकांसाठी अल्पदरात वैद्यकीय सेवा, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका उभारण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे.
डोंबिवलीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री गणेश मंदिर संस्थान यावर्षी शतकमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. शतकमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधत मंदिरातील गाभारा चांदीचा करण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. मंदिराचेही सुशोभीकरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक, उपाध्यक्ष सुहास आंबेकर, कार्यवाह प्रवीण दुधे, राहुल दामले, मंदार हळबे, श्रीपाद कुलकर्णी, गौरी खुंटे, शताब्दी महोत्सव संयोजन समितीचे संयोजक वैद्य वेलणकर, बाळकृष्ण पाटील, जगन्नाथ पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

---------------------
कार्यक्रमांची मांदियाळी
शतकमहोत्सवी वर्षाच्या पूर्वसंध्येला ७ मे रोजी रात्री महाढोलताशा वादन कार्यक्रम होणार आहे. या वेळी ६०० ते ७०० तरुण ढोलवादन करणार आहेत. ८ मे रोजी शतकमहोत्सवी वर्ष उद्‍घाटन सोहळ्याने या वर्षाची सुरुवात होणार आहे. या वेळी पंढरपूरचे हभप चैतन्य महाराज देगलूरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त महारक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापन, सामाजिक संस्थांमध्ये मंदिरांची भूमिका या विषयावर महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थानांच्या विश्वस्तांची परिषद पार पडणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com