कुलकर्णी परिवारातर्फे गझलभान कार्यक्रम

कुलकर्णी परिवारातर्फे गझलभान कार्यक्रम

डोंबिवली, ता. १ (बातमीदार) : चंद्रशेखर सानेकरांचे ‘एकटे दुकटे शेर‘ हे मुक्त शेरांचे संकलन असलेल्या संग्रह नुकताच ग्रंथालीने प्रकाशित केला आहे. त्यानिमित्ताने डोंबिवलीत कुलकर्णी परिवारातर्फे गझलभान हा कार्यक्रम पार पडला. यात सुरुवातीला कवी चंद्रशेखर सानेकरांनी आपले मनोगत मांडताना गझल ही संस्कृत लोकांशी कशी जवळीक साधून असते यांचे उदाहरण देऊन स्पष्टीकरण केले. त्यानंतर श्रीराम शिधये यांनी दाखले देऊन गझलेचा उगम ते आजच्या गझलेतील सामर्थ्य एवढा मोठा काळाचा पट मांडताना रसिकांना अगदी गुंगवून टाकले. कविवर्य रवींद्र लाखे यांनी शेखरच्या नविन संग्रहातले अनेक शेर उधळत त्यातला नेमका गाभा पकडण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ पत्रकार लेखक दिनकर गांगल यांनी कवी चंद्रशेखर सानेकरच्या या संग्रहात मी वाचता वाचता कसा रमत गेलो हे मार्मिक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. गणेश मनोहर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रेक्षकांमध्ये विंदा नवरे, रविप्रकाश कुलकर्णी, सुलभा कोरे, कवी संदेश ढगे, प्रवीण दामले, गोविंद नाईक आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com