महाराष्ट्र भवनचा सिडकोला विसर

महाराष्ट्र भवनचा सिडकोला विसर

तुर्भे, ता. १ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील वाशी सेक्टर ३० येथे सिडकोच्या माध्यमातून देशातील सर्व राज्यांना राज्य भवनसाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे. आजच्या घडीला या ठिकाणी सर्व राज्यांची ‘भवन’ दिमाखात उभी आहेत. मात्र, ‘महाराष्ट्र भवन’ची एक वीटसुद्धा सिडकोने रचली नसल्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहेत.
नवी मुंबई शहराला वेगळी ओळख मिळावी, यासाठी सिडकोच्यावतीने वाशीमध्ये सर्व राज्यांतील भवनांसाठी भूखंड दिले गेले आहेत. या भवनांमध्ये प्रत्येक राज्याने आपला सांस्कृतिक ठेवा प्रातिनिधिक स्वरूपात जपण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील प्रत्येक राज्याची ‘भवन’ या ठिकाणी दिमाखात उभी आहेत. मात्र, ‘महाराष्ट्र भवना’साठी दिलेल्या भूखंडावर पायाही खणला गेला नसल्यामुळे आपल्या राज्यातच ‘महाराष्ट्र भवना’ची वास्तू उभी राहू न शकल्याची मोठी शोकांतिका समोर येत आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी महाराष्ट्र भवन उभारावे, यासाठी विविध राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आघाडी सरकार असताना मार्चमधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी देखील केली होती. तरीदेखील सिडको याबाबत संवेदनशील नसल्याचा प्रत्यय येत आहे.
-----------------------------------
उभारणीसाठी १०० कोटींचे आश्वासन
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईतील ‘महाराष्ट्र भवना’साठी १०० कोटी रुपये दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, शासनाच्या वतीने आश्वासन देऊनदेखील महाराष्ट्र भवनाची अजून एक वीट रचली गेली नाही. त्यामुळे मागील २५ वर्षांपासून आरक्षित असलेल्या भूखंडावर ‘भवन’ कधी उभे राहणार, असा सवाल उपस्थित आहे.
-------------------------------------------------------
नवी मुंबई शहरात आज सर्व राज्यांची ‘भवन’ दिमाखात उभी आहेत. मात्र, महाराष्ट्र राज्यातच भूखंड आरक्षित असूनदेखील मागील २५ वर्षांपासून ‘महाराष्ट्र भवन’ उभे राहत नाही, ही शोकांतिका आहे.
- बाळासाहेब शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे सहकार सेना
----------------------------------------------
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच अयोध्या दौरा केला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्र भवन उभारले जाईल, अशी घोषणा केली. मात्र आपल्याकडे भूखंड उपलब्ध असून शासन स्तरावर कुठलीच हालचाल नाही.
- मनोज मेहेर, माजी ‘ब’ प्रभाग समिती सदस्य, मनपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com