‘उल्हासनगर महानगरपालिकाच कंत्राटी पद्धतीने चालवा’

‘उल्हासनगर महानगरपालिकाच कंत्राटी पद्धतीने चालवा’

उल्हासनगर (वार्ताहर) : भरती प्रक्रिया टाळून बहुतांश विभागात कंत्राटी कामगार ठेवण्यात आले आहेत. असेच करायचे असेल तर संपूर्ण उल्हासनगर महापालिकाच कंत्राटी पद्धतीने चालवा, असे लेखी निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे कल्याण जिल्हा समन्वयक, माजी उपमहापौर धनंजय बोडारे यांनी पालिका आयुक्त अजीज शेख यांना दिले आहे. महापालिका प्रशासनाने विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने सफाई कामगारांची भरती केली आहे. आता पाणीपुरवठा विभागातही कंत्राटी अभियंता, तांत्रिक विभागात काम करणारे कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या विभागात स्थायी पद्धतीने काम करणारे अधिकारी व कर्मचारीच असावे लागतात, त्यांना शहरातील पाणीपुरवठा, जलवाहिन्या, व्हॉल्व आदींची तपशीलवार माहिती असायला हवी. कंत्राटी पद्धतीने हे काम शक्य नाही, असे धनंजय बोडारे यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com