तंत्रज्ञानामुळे होणारे बदल समजून घेणे गरजेचे

तंत्रज्ञानामुळे होणारे बदल समजून घेणे गरजेचे

चेंबूर, ता. १ (बातमीदार) ः तंत्रज्ञानामुळे वेगाने होणारे बदल कुठल्या पद्धतीने बदलत आहेत, हे समजून घेणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन मुंबई रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्राध्यापक अनिरुद्ध पंडित यांनी केले. मराठी विज्ञान परिषदेचा ५७ वा वर्धापनदिन रविवारी (ता. ३०) चुनाभट्टी येथील मराठी विज्ञान परिषद विज्ञान भवन सभागृहात पार पडला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
पंडित यांनी सांगितले, की मनुष्याचा स्वभाव वेगवान आहे. त्‍याला सर्व गोष्‍टी कमी वेळात साध्‍य करायच्‍या असतात. निसर्गापेक्षा अधिक वेगाने मनुष्‍य बदल घडवून आणतो; मात्र हे बदल करत असताना ज्या पद्धतीने आपल्याला प्रगती करायची आहे, यामध्ये कुठे तरी मिसमॅच आहे. हे आपल्‍याला शोधून ते सरळ करता आले, तर शाश्वत प्रगती निश्चित होऊ शकते. यासाठी निसर्गाच्या पद्धतीचा इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी पद्धतीने विचार करणे गरजेचे आहे, असे मत अनिरुद्ध पंडित यांनी व्यक्त केले. मुले सध्या मोबाईलवर मोठ्या प्रमाणात गेम खेळत असतात; मात्र मुलांनी पुस्तक वाचले पाहिजे. पुस्तक वाचल्याने पुस्तकाचा अर्थ कळतो. पुस्तक हे जगायला शिकवतात. त्‍यासाठी मुलांना पुस्‍तके वाचायना द्या, असा सल्‍ला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी दिला.

हे झाले सभासद
डॉ. विजय गुपचुप, डॉ. बाळ फोंडके, डॉ. केतन गोखले, डॉ. अभय बंग, अरविंद गुप्ता या पाच व्यक्तींना मराठी विज्ञान परिषदेचे सन्माननीय सभासदत्व बहाल करण्यात आले.

पुरस्‍कारांचे वितरण
सु. त्रि. तासकर पुरस्कार पुणे जिल्ह्यातील आश्रम पाबळ संस्थेला देण्यात आला; तर सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार डॉ. नंदा हरम; तर विज्ञान संशोधनाचा प्रथम पुरस्कार मुंबई कुदनानी महाविद्यालयाच्या चौधरी खतिजा खातून, द्वितीय पुरस्कार पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या कृतिका खुंटेटा, अमेय हेबळे आणि अरीबा नदीन, तृतीय पुरस्कार मुंबई विल्सन महाविद्यालयाच्या साक्षी कुंभार, पार्थ आरोलकर आणि केओल कपितान; तर उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक अशीही एक झुंज पुस्तकाच्या लेखिका प्राध्यापक मृदुला बेळे यांना मान्‍यवरांच्या हस्ते देण्यात आला.

ई पुस्तक प्रकाशन
प्रा. अनिरुद्ध पंडित व ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते मराठी विज्ञान परिषद ई पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे निवेदन सुचेता भिडे; तर आभार प्रदर्शन संचालक राजेश समेळ यांनी केले. या कार्यक्रमाला विज्ञानप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com