चारचाकी चोरणारा सराईत जेरबंद

चारचाकी चोरणारा सराईत जेरबंद

पनवेल, ता.१(वार्ताहर) : चारचाकी वाहने चोरणाऱ्या एका सराईत वाहन चोराला पनवेल शहर पोलिसांनी आळंदीतून अटक केली आहे. रेवन सोनटक्के (२२) असे या चोरट्याचे नाव असून पनवेल, पुणे भागात वाहन चोरी केली आहे.
पनवेलमधील कोळखे गाव येथील एसबी गॅरेज समोर किशन मलगी यांची होंडा सिटी कार चोरण्यात आली होती. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळीवरील सीसीटीव्हींची तपासणी केली असताना कार चोरण्यासाठी वापरलेली एक कार घटनास्थळी दिसून आली होती. या गाडीची माहिती काढली असता ही कार खांदेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे आढळून आले होते. त्यानंतर पनवले शहर पोलिसांनी बातमीदारांच्या साहाय्याने अशा प्रकारे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध सुरु केला होता. याच तपासादरम्यान पोलिसांना पुणे आळंदी येथे राहणाऱ्या रेवण सोनटक्केची माहिती मिळाली.
-----------------------------------------
राहण्याच्या ठिकाणात वारंवार बदल
रेवण वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा शोध घेणे आव्हानात्मक झाले होते. अखेर आरोपी आळंदी येथे येणार असल्याची मिळाल्यानंतर पोलिसांनी केळगाव, आळंदी येथून स्थानिक पोलिसांच्या मदतीने रेवणला अटक केली.
------------------------------------------------------------
रेवण सोनटक्के हा वाहन चोरण्यात पटाईत आहे. त्याच्यावर यापूर्वी १३ वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्याला २ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
-पंकज डहाणे, पोलिस उप-आयुक्त, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com