दोन दिवस पाणीटंचाईचे संकट

दोन दिवस पाणीटंचाईचे संकट

नवीन पनवेल (वार्ताहर)ः न्हावा-शेवा उप प्रादेशिक पाणी पुरवठा योजना टप्पा १ अंतर्गत येणाऱ्या करंजाडे, डेरीवली, वडघर, विचुंबे, पारगांव, दापोली, कुंडेवहाळ, ओवळे, विठ्ठलवाडी, उसर्ली, कसळखंड, बेलवली, वारदोली, नांदगाव, कुडावे या गावांचा पाणी पुरवठा बुधवारी (ता.३) २४ तासांसाठी बंद राहणार आहे.
न्हावा-शेवा पाणी पुरवठा योजना अंतर्गत भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राअंतर्गत पंप दुरूस्ती ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती व मान्सूनपूर्व कामे तसेच गाढी नदीतील १२१९ मि.मी. व १३२० मि.मी.ची जुनी जलवाहिनी क्रॉस कनेक्शन करणे व इतर कामे तसेच जलवाहिन्यांच्या दुरूस्तीकरीता शुक्रवारी (ता. ६) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे शटडाऊन तसेच पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com