घणसोलीमध्ये आपला दवाखाना

घणसोलीमध्ये आपला दवाखाना

घणसोली, ता. १ (बातमीदार) : सार्वजनिक आरोग्य विभागानंतर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याच्या माध्यमातून हजारो मुंबईकरांना विनामूल्य आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे. त्‍याचे उद्‍घाटन घणसोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने पार पडले.
शिंदे सरकारची नवीन योजना असणारी आपला दवाखाना हा ठाणे आणि मुंबई शहरात अनेक ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. नवी मुंबईतील घणसोली विभागातही आपला दवाखाना सोमवारी सुरू करण्यात आला. घणसोली कोळीवाडा या ठिकाणी हा दवाखाना उभारण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत २५ ते ३० हजार लोकसंख्येसाठी एक दवाखाना सुरू करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. हा दवाखाना सकाळी ७ ते दुपारी २ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत सुरू राहील. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ योजना सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचा दूरदृश्य प्रणालीद्वारे विस्तार करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथून दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींसमवेत सहभागी झाले. या योजनेतून ३० विविध चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com