kajal hindusthani
kajal hindusthani sakal

kajal Hindustani : काजल हिंदुस्थानीच्या विरोधात गुन्हा दाखल

या मोर्चामध्ये काजल हिंदुस्थानीने आपल्या भाषणात विशिष्ट धर्माविरुद्ध विधाने व निवेदन करून धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले होते.

नवी मुंबई - गत फेब्रुवारी महिन्यात वाशीमध्ये सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या काजल हिंदुस्थानी हिच्याविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काजल हिंदुस्थानी हिने आपल्या भाषणात विशिष्ट धर्माविरुद्ध विधाने व निवेदन करून धार्मिक तेढ निर्माण केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

kajal hindusthani
Pune News : कोथरूडकरांनो सावध व्हा! सिंहगडाजवळ पुन्हा दिसला गवा


२६ फेब्रुवारी रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने वाशीतील ब्ल्यू डायमंड चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यादरम्यान मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी वाशी सेक्टर नऊ ‘ए’ मधील भाजी मार्केटशेजारील रस्त्यावर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चामध्ये काजल हिंदुस्थानीने आपल्या भाषणात विशिष्ट धर्माविरुद्ध विधाने व निवेदन करून धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण केले होते. त्याचप्रमाणे या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या मोर्चेकऱ्यांनी ‘तू काली बन, तू दुर्गा बन, कभी ना बुरखेवाली बन व अब्दुल, असलम की पहचान लडकी, बकरी एकसमान’ अशा प्रकारचे पोस्टर घेऊन त्या प्रकारच्या घोषणादेखील देत होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com