डहाणूत बागायतदारांची धांदल

डहाणूत बागायतदारांची धांदल

डहाणू, ता. १ (बातमीदार) ः तालुक्याच्या किनारपट्टी भागात सोमवारी (ता. १) सकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी, बागायतदार आणि मच्छीमारांची चांगलीच धांदल उडाली. डहाणू तालुक्याच्या किनारपट्टी भागातील चिंचणी, वाणगाव, डहाणू, वरोर, वाढवण, बाडापोखरण, धाकटी डहाणू परिसरात अचानक सोमवारी सकाळी नऊच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेती, बागायती आणि मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. धाकटी डहाणू येथे मच्छीमारांनी सुकत टाकलेले बोंबील, करंदी आणि इतर लहान माशांचे नुकसान झाले; तर शेतकऱ्यांनी शेतात गुरांसाठी ठेवलेला पेंढा भिजला. बागायतीमधील मिरची पिकाचेही नुकसान झाले. अद्यापही हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता असून सोमवारी दिवसभर वातावरण ढगाळ होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com