कल्याणमध्ये बालवाचनालय सुरू

कल्याणमध्ये बालवाचनालय सुरू

कल्याण, ता. २ (बातमीदार) : सजग संस्थेच्या वतीने कल्याणमध्ये बाल वाचनालय सुरू झाले असून त्याचे उद्‍घाटन प्रसिद्ध अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. कल्याण पश्चिमेला पारनाका परिसरात सजग चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित एन-रीड हे बाल वाचनालय सुरू झाले आहे. उद्‍घाटन कार्यक्रमात सजगच्या सह-संस्थापक सजिता यांनी सांगितले की, पुस्तकांमध्ये असलेली विविधता मुलांमध्ये कुतूहल जागृत करण्यात मदत करेल. त्यांना शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींचा शोध घेण्याची आवड निर्माण होईल. या वेळी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी खास मुलांसाठी वाचनालय तयार करण्याच्या उपक्रमाचे कौतुक केले. अशा वाचनालयामुळे पालक आणि मुलांना एकत्रितपणे पुस्तकांच्या सहवासात वेळ घालवण्यासाठी मोकळे वातावरण मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com