अमनदूत मेट्रो स्थानकाचा गोर-गरीब रुग्णांना आधार

अमनदूत मेट्रो स्थानकाचा गोर-गरीब रुग्णांना आधार

खारघर, ता. २ (बातमीदार)ः अमन दूत मेट्रो स्थानकापासून दोनशे मीटर अंतरावर श्री सत्यसाई संजीवनी सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर रुग्णालय आहे. या रुग्णालयात नवजात बालकांपासून अठरा वर्षे वयोगट असलेल्या बालकांवर हृदयासंबंधीच्या आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया करून उपचार केले जात आहेत. त्यामुळे देशातील विविध प्रांतातून उपचारासाठी येणाऱ्या गोरगरिबांसाठी हे स्थानक महत्त्वाचे ठरणार आहे.
नवी मुंबई मेट्रो मार्गातील अमन दूत मेट्रो स्थानकाच्या एका बाजूला सेक्टर ३६ मधील स्वप्नपूर्ती आणि नव्याने उभारण्यात आलेल्या सेक्टर ४० मधील भाग्यश्री वसाहत तसेच सेक्टर ३४ या वसाहतीत नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्य करीत आहेत. सिडको वसाहतीला लागून इनामपुरी, तळोजा आणि एकटपाडा, फरशीपाडा आणि पापडीचापाडा आदी गावे आहेत. तसेच या स्थानकाला लागूनच सत्य साई बाबा संजीवनी रुग्णालय आणि रॅपिड ॲक्शन फोर्स कॅम्प आहे. त्यामुळे देशाच्या विविध प्रातांतून येणाऱ्या रुग्णांसाठी अमनदूतचे मेट्रो स्थानक महत्त्वाचे ठरणार आहे.
---------------------
पैशांसोबत वेळेचा अपव्यय टळणार
या परिसरातील प्रवाशांना एनएमएमटी किंवा खासगी वाहनावर अवलंबून रहावे लागते. अनेकदा एनएमएमटी वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे नाहक जादा पैसे मोजण्याची वेळ प्रवाशांवर येते. तसेच वेळही खर्ची पडत असल्याने नवी मुंबई मेट्रोमुळे नागरिकांचा प्रवास सुखमय होणार आहे.
------------------------------------------------------
खारघर, सेक्टर ३४ मधील रहिवाशांना अमन दूत मेट्रो स्थानकावर जाताना समोर नाला असल्यामुळे वळसा घालून जावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकाचा वेळ वाया जाणार असल्याने सिडकोने नाल्यावर पादचारी पूल उभारावा.
- डॉ. स्वप्नील पवार, रहिवासी, खारघर
-------------------------------------------------
झपाट्याने विकास झालेला शहर म्हणून खारघर शहराची ओळख आहे. काही दिवसांत मेट्रो सुरू होणार असल्यामुळे खारघर आणि तळोजाकरांची गैरसोय टळणार आहे.
- प्रा. समाधान लांडगे, रहिवासी, खारघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com