एनएमएमटीच्या सहा वाहकांचा सन्मान

एनएमएमटीच्या सहा वाहकांचा सन्मान

नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : एनएमएमटीच्या बसमध्ये सर्वाधिक वार्षिक ऑनलाईन अर्थव्यवहार करणाऱ्या सहा वाहकांचा महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेच्या वतीने हा उपक्रम करण्यात आला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाअंतर्गत एनएमएमटी बसमध्ये जानेवारी २०२२ पासून फोन पेव्दारे कॅशलेस प्रणालीचा वापर करून तिकीट वितरण करण्यात येत आहे. याच अनुषंगाने एनएमएमटीचे वाहक शिवाजी देवकर, राजेंद्र पाटील, मयूर नायकोडी या वाहकांनी सर्वाधिक वार्षिक ऑनलाईन अर्थव्यवहार केले आहेत; तर वाहक दीपक दराडे, शंकर गवते, दिलीप पवार यांनी सर्वाधिक सहामाही ऑनलाईन अर्थव्यवहार केले आहेत. त्यामुळे ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर करून सर्वाधिक वार्षिक उत्पन्न मिळवणाऱ्या या वाहकांना पालिकेने प्रोत्साहनपर २१ हजार रुपयांचा धनादेश तसेच विशेष भेटवस्तू देऊन सन्मानित केले आहे.
---------------------------------------------------
आधुनिकतेची कास धरणाऱ्या एनएमएमटी वाहकांच्या चांगल्या कामाची दखल घेण्यात आली आहे. त्यामधून त्यांना प्रोत्साहन मिळेलच; याशिवाय इतर वाहकांनाही यामधून आणखी चांगले काम करण्याची स्फूर्ती मिळणार आहे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com