दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

‘शिका मस्त बिनधास्त छंद’ वर्गाचा समारोप
शिवडी, ता. २ (बातमीदार) ः विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या शिक्षण विभागामार्फत गेले १५ दिवस सुरू असलेला ‘शिका मस्त बिनधास्त छंद’ या कार्यक्रमाचा समारोप सोमवारी (ता. १) परळ पूर्व येथील महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात पार पाडला. या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून इन्फोमॅटिका अकादमीचे संचालक अवधूत वाघ उपस्थित होते. या छंद वर्गामध्ये इयत्ता दुसरी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले होते. या १५ दिवसांमध्ये मुलांना हस्तकला, वृक्षारोपण, चित्रकला, नृत्य, मॅजिक शो, मातीकाम, शैक्षणिक सहल, वाद्य वाजवणे, गणितातील गमती-जमती इत्यादी विषयांचे प्रशिक्षण अनुभवी तज्ज्ञ शिक्षिकांकडून देण्यात आले. विद्यार्थी उत्कर्ष मंडळ गेली दहा वर्षे छंदवर्गाचे आयोजन करीत असून ही बाब कौतुकास्पद असल्याचे शिक्षिका शिल्पा वैद्य यांनी सांगितले.

संयुक्त जयंती उत्सव सोहळा
मुलुंड, ता. २ (बातमीदार) ः महापालिका टी विभाग व संयुक्त जयंती उत्सव समिती यांच्या विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन मुलुंड पश्चिमेतील कालिदास नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी उपस्थितांना संबोधित केले. या कार्यक्रमाला टी विभागाचे सहायक आयुक्त अजय पाटणे, संघटनेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, चिटणीस अजय राऊत व जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुजित माने आदी मान्यवर उपस्थित होते.

घरेलू महिला कामगारांसाठी शिबिर
कांदिवली, ता. २ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिम येथील महापालिका शाळेच्या सभागृहामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक दीपक (बाळा) तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये नोंदणी केलेल्‍या जवळपास ३८२ घरेलू महिला कामगारांनी विवीध योजनांचा लाभ घेतला. या वेळी असंटित कामगार व घरेलू महिला कामगार यांना खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्या हस्ते ई-श्रम व आयुष्यमान कार्डचे वाटप करण्यात आले. या वेळी मंडळ महामंत्री योगेश पडवळ, वॉर्ड अध्यक्ष आर. एस. वर्मा, संतोष जाधव, गजानन गवई, पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com