वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू

पनवेल (वार्ताहर) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून रस्ता ओलांडणाऱ्या एका व्यक्तीचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. पनवेलजवळील सुकापूर येथे शनिवारी रात्री ही घटना घडली होती. याप्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेतील मृत व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील असून शनिवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास तो पनवेलजवळील सुकापूर येथील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून रस्ता ओलांडून जात होता. या वेळी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाने धडक दिली होती. या वेळी खांदेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com