वर्क फ्रॉम होम ऑफर महागात

वर्क फ्रॉम होम ऑफर महागात

ठाणे (वार्ताहर) : चितळसर परिसरात राहणाऱ्या ५१ वर्षीय महिलेला अज्ञात व्यक्तीने वर्क फ्रॉम होम ऑफर देण्याचे प्रलोभन दाखवत आठ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी महिलेने चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मानपाडा परिसरातील चितळसर येथे राहणाऱ्या महिलेला अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅप कॉल करत सोशल बिट कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले. महिलेला वर्क फ्रॉम होम जॉबची ऑफर देत चांगल्या कमाईचे १८ एप्रिल ते २० एप्रिल या कालावधीत आश्वासन दिले. महिलेला त्याने ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यासाठी आठ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले; मात्र ऑनलाईन जॉबही मिळाला नाही आणि आठ लाखांची रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने तक्रार दाखल केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com