‘केईएम’मध्ये उभाणार सेंटेनरी भवन

‘केईएम’मध्ये उभाणार सेंटेनरी भवन

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : परळचे केईएम रुग्णालय आता शतकपूर्तीच्या मार्गावर आहे. या शतकपूर्तीनिमित्त रुग्णालय परिसरात लवकरच सेंटेनरी भवन- १ ही इमारत उभारली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या इमारतीच्या पायाभरणीची प्रक्रिया केली जाईल, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
केईएम रुग्णालयाला १०० वर्षे पूर्ण होणार असल्याने या इमारतीला सेंटेनरी असे नाव देण्यात येणार आहे. सेंटेनरी १ आणि सेंटेनरी २ अशा दोन इमारती परिसरात बांधल्या जाणार आहेत. पहिल्या इमारतीच्या रचनेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही १२ मजली इमारत असणार असून या इमारतीत रक्तपेढी शिफ्ट केली जाईल. तसेच क्लिनिक आणि प्रयोगशाळा तयार केल्या जातील. यासह विद्यार्थ्यांसाठीचे ऑडिटोरियम तयार केले जाईल.
केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार ही १२ मजली नवी इमारत बांधली जाणार आहे. त्या इमारतीच्या पायाभरणीचे काम पुढच्या आठवड्यात होईल. सर्व्हिस टॉवर पद्धतीने ही इमारत तयार केली जाईल. २६ मे रोजी केईएमला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे ही सेंटेनरी भवन इमारत बांधली जात आहे. अशा दोन इमारती तयार होतील. यात प्रयोगशाळा, रक्तपेढी आणि मुलांना बसण्यासाठी ऑडिटोरियम तयार केले जाईल. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेच्या म्हणण्यानुसार मोठे लेक्चर थिएटर असले पाहिजे. २५० पेक्षा जास्त मुले या ऑडिटोरियममध्ये बसतील अशी व्यवस्था केली जाईल. पहिली इमारत किमान तीन वर्षांत तयार होईल.
...
दुसऱ्या इमारतीचाही प्रस्ताव
सद्यस्थितीत रक्तपेढी सुरू असलेल्या ठिकाणी भविष्यात सेंटेनरी भवन- २ ही इमारत बांधली जाईल. त्याच्यासाठीही प्रस्ताव तयार केला गेला आहे; मात्र या इमारतीला आणखी बराच काळ जाईल, असेही डॉ. रावत यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com