खैराची तस्करी करणारे वाहन जप्त

खैराची तस्करी करणारे वाहन जप्त

वाडा, ता. २ (बातमीदार) : तालुक्यातील असनस येथील जंगलात खैर या मौल्यवान वृक्षांची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती वाडा पश्चिमचे वनक्षेत्रपाल व्ही. पी. लेंडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे आज (ता. २) सकाळी असनस येथे सापळा रचण्यात आला होता. या ठिकाणी पिकअप ट्रक येताच तिची तपासणी केली असता खैराची बेकायदा वाहतूक होत असल्याचे समोर आले. वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने मालासह पिकअप ट्रक ताब्यात घेतला. जप्त सामानाची बाजारभावाप्रमाणे किंमत अडीच लाख रुपयांच्या आसपास आहे. ही कारवाई वनक्षेत्रपाल व्ही. पी. लेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनंता जाधव, वनरक्षक किरण सोनवणे, यशपाल सपकाळ, डी. मस्के, गणेश मोहिते, सागर देशमुख यांच्या पथकाने केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com