अंबरनाथ रेल्वेस्थानकातील पादचारी पूल बंद

अंबरनाथ रेल्वेस्थानकातील पादचारी पूल बंद

अंबरनाथ, ता. २ (बातमीदार) ः अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवरील पादचारी पुलाला जोडणारा जिना दीड महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. या जिन्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

अंबरनाथ रेल्वे स्थानकातील फलाट एक आणि दोनवरील कर्जतच्या दिशेकडील पादचारी पुलाला जोडणारा जिना धोकादायक आणि नादुरुस्त झाला आहे. तो दुरुस्तीच्या कामासाठी २ मेच्या मध्यरात्रीपासून १६ जून २०२३ या दीड महिन्याच्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या नादुरुस्त स्थितीतील जिना अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला जाणाऱ्या पादचारी पुलाला जोडण्यात आला आहे. त्याचा वापर प्रवासी करत असतात; मात्र क्रमांक एक फलाट ते क्रमांक तीन फलाटाला जोडणारा पादचारी पूल नादुरुस्त झाल्याने यापूर्वीच तोडण्यात आला आहे. पादचारी पूल नसल्याने सरकते जिने वापराविना पडून आहेत. नजीकच्या काळात रेल्वेची तिसरी आणि चौथी मार्गिका टाकण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मार्गिका टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कर्जतच्या दिशेकडील फलाट क्रमांक एकवरून फलाट तीनला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com