‘इंडिगो’च्या विमानात बिघाड

‘इंडिगो’च्या विमानात बिघाड

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २ : मुंबई विमानतळावरून नैनितालला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विमान रनवेवरच दोन तास खोळंबून राहिले होते. त्यामुळे दीड ते दोन तास विमानातच खोळंबून राहिलेल्या प्रवाशांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी विमानाबाहेर पडून रनवेवर ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे मुंबई विमानतळावर मोठा गोंधळ निर्माण झाला.

इंडिगो कंपनीचे विमान मंगळवारी सकाळी ८ वाजता मुंबईहून नैनितालकरिता उड्डाण करणार होते; परंतु तांत्रिक बिघाडामुळे विमान दीड ते दोन तास धावपट्टीवरच थांबले. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांचाही खोळंबा झाला. अखेर प्रवाशांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी विमानाबाहेर पडून पर्यायी विमानाची व्यवस्था करावी या मागणीसाठी रन वेवरच ठिय्या मांडला. त्यामुळे काही काळासाठी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सीआयएसएफच्या जवानांना रन वेवर पाचारण करण्यात आले. त्यानंतर रनवेवर बसलेल्या प्रवाशांना बसमध्ये बसवून पुन्हा विमानतळावर आणण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com