१,५१३ चालकांवर पनवेलमध्ये कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१,५१३ चालकांवर पनवेलमध्ये कारवाई
१,५१३ चालकांवर पनवेलमध्ये कारवाई

१,५१३ चालकांवर पनवेलमध्ये कारवाई

sakal_logo
By

पनवेल, ता. २७ (बातमीदार) : पनवेल शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे. याअंतर्गत गेल्या पाच महिन्यांत १,५१३ वाहनांवर कारवाई केली आहे.
राज्यात हेल्मेट सक्ती मोठ्या प्रमाणात गाजत आहे. मोठमोठ्या शहरांत याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रबोधन आणि जनजागृती करण्यात येत आहे. असे असताना पनवेल परिसरात दुचाकीस्वार विनाहेल्मेट प्रवास करत आहेत. त्यामुळे पनवेल शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय नाळे यांनी रस्त्यावर उतरून अशा वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. यामध्ये नो एंट्रीत प्रवेश करणे, चारचाकी वाहनांना काळ्या काचा, सीटबेल्ट, ट्रिपल सीट, सिग्नल जंपिंग, नो पार्किंग, अवजड वाहने, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या १,५१३ वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
----------------------------
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात गेल्या पाच महिन्यांत १,५१३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच जनजागृतीमुळे हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
- संजय नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा