
दिव्यात सरकारी योजना मार्गदर्शन शिबिर
दिवा, ता. २८ (बातमीदार) : नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला नऊ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचे शिबिर दिवा शहरात आयोजित करण्यात आले होते. ठाणे महापालिका शाळा क्रमांक ७९ येथे पाच दिवस या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दिव्यातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यात प्रामुख्याने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी, पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, जन-धन योजना, ई-श्रम योजना, बचत गट नोंदणी व सवलतीत कर्जपुरवठा अशा योजनांचा यात समावेश आहे. या योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा म्हणून ठाणे शहर जिल्हाध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे व ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात दिवा मंडळात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.