भिवंडीत ५५ गावे पूरग्रस्त क्षेत्रात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत ५५ गावे पूरग्रस्त क्षेत्रात
भिवंडीत ५५ गावे पूरग्रस्त क्षेत्रात

भिवंडीत ५५ गावे पूरग्रस्त क्षेत्रात

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. २८ (बातमीदार) : पावसाळ्यात भिवंडी तालुका जलयम होण्याचा धोका पाहता, आताच जिल्हा प्रशासनाने तालुक्यातील पूरग्रस्त गावांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार भिवंडी तालुक्यात ५५ गावे पूरग्रस्त असून, सहा गावांवर दरड कोसळण्याचा धोका आहे. त्यामधील शहरातील पाच गावांचाही समावेश आहे. तहसीलदार अधिक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, तानसा नदी काठावरील अंबाडी, दिघाशी, दलोंडे, झिडके, अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी, जांभिवलीतर्फे खंबाळे, चाणे, शेलार, खोणी, कांबे, काटई, पिंपळशेत, भुईशेत, खारबाव, कारिवली, कालवार, वडघर, डुंगे, वडुनवघर, काल्हेर, सरवली, रांजणोली, ठाकुरगाव, केल्हे, उंबरखाड, नेवाडे, तुळशी, मोहडुंळ, कुंभारशिव, वांद्रे, कळंबोली, सोर, भरोडी, वेहळे, सारंग, पिपंळनेर, गोवे, पिंपळास, पिपंळघर, कोनगाव, पडघा, अर्जुनली, कुकसे, तळवलीतर्फे सोनाळे, बोरीवली तर्फे सोनाळे, भादाणे, पिसे, चिराडपाडा, खांडपे, खातिवली, चिचंवलीतर्फे कुंदे; तर शहरातील निजामपूर, भिवंडी व नारपोली या ५५ गावांना पूरग्रस्त घोषित केले आहे.