Wed, Sept 27, 2023

मुंबईत सतरावे अवयवदान
मुंबईत सतरावे अवयवदान
Published on : 28 May 2023, 12:19 pm
मुंबई, ता. २८ : फोर्टिस रुग्णालयात ४० वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूपश्चात झालेल्या अवयवदानामुळे एकाला जीवदान मिळाले आहे. या वेळी मुंबईत १७ वे यशस्वी अवयवदान पार पडले असून यंदा अवयवदान चळवळीला वेग आल्याचे चित्र आहे.
फोर्टिस रुग्णालयात काही दिवसांपूर्वी प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे एका ४० वर्षीय व्यक्तीला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले; पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना अवयवदानासाठी समुपदेशन केले. त्यानंतर नातेवाईकांनी या व्यक्तीचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, या व्यक्तीच्या यकृताचे दान करण्यात आले. या दानामुळे एकाला जीवनदान मिळाले आहे. हे अवयवदान झेडटीसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केले गेले असल्याचे समन्वयकांनी सांगितले.