खासगी बसचालकांची मनमानी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बसचालकांची मनमानी
खासगी बसचालकांची मनमानी

खासगी बसचालकांची मनमानी

sakal_logo
By

घणसोली, ता.२९ (बातमीदार)ः नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसचालक रस्त्यावर मनमानी पद्धतीने वाहने उभी करत आहेत. या प्रकारांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून सायन पनवेल महामार्गावरील सानपाडा पुलाखाली बस चालकांची हीच मनमानी कोंडीत भर घालत असल्याने वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
शहरात अनेक ठिकाणी खासगी बस चालक प्रवाशांसाठी रस्त्याच्या कडेला वाहने उभ्या करत असल्याचे पाहायला मिळते. या चालकांनी रहदारीच्या रस्त्यांवरच बेकायदा थांबे तयार केले असल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. पुणे, सातारा, सोलापूरकडे जाणाऱ्या खासगी गाड्या जोपर्यंत भाडे मिळत नाही, तोपर्यंत एकाच ठिकाणी उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहनांची जास्त वर्दळ असलेल्या मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा पुलाखाली हीच परिस्थिती असून वाहतूक पोलिस याप्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याने इतर वाहनचालकांना मनस्ताप होत आहे.
--------------------------
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
सानपाडा पुलाखाली रात्रीच्या वेळेस ७ ते १२ दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांग लागलेल्या पाहायला मिळतात. रस्त्याचा बराचसा भाग या वाहनांमुळे व्यापला जात असल्याने नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
----------------------------------
सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा पुलाखालची रोज रात्री खासगी बसवाल्यांकडून महामार्गावर कोंडी करण्याचे प्रकार होतात. त्याच्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने मनमानी सुरूच आहे.
- मनोज पांडे, वाहनचालक
-----------------------------------------
खासगी बसमुळे रस्त्यावर कोंडी होत असल्याचे दिसत असतानाही वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे महामार्गावरील कोंडीत यामुळे भर पडत आहे.
- डिंपल पाष्टे, वाहनचालक