कल्याण वाचनालयात स्वा. सावरकरांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याण वाचनालयात स्वा. सावरकरांना अभिवादन
कल्याण वाचनालयात स्वा. सावरकरांना अभिवादन

कल्याण वाचनालयात स्वा. सावरकरांना अभिवादन

sakal_logo
By

कल्याण, ता. २९ (बातमीदार) : ब्रिटिश राजवटीतील नेटिव्ह लायब्ररी या शब्दाला ‘वाचनालय’ हा प्रतिशब्द थोर स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक वि.दा.सावरकर यांनी बहाल केला आहे. वयाच्या ९ व्या वर्षी सावरकरांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. आजचा दिवस स्वा.सावरकरांच्या असीम त्याग, समर्पण व आत्मनिर्भरतेला अभिवादन करण्याचा आहे. स्वा. वि. दा.सावरकर यांची १४० वी जयंती शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या सार्वजनिक वाचनालय कल्याणमध्ये संपन्न झाली. प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना वाचनालयाचे विश्वस्त सुरेश पटवर्धन बोलत होते. सार्वजनिक वाचनालय कल्याणचे माजी विश्वस्त तथा बिर्ला महाविद्यालयाचे उपप्राचार्य उदय सामंत यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्य संपदेच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन कार्यकारिणी सदस्य अरुण देशपांडे व प्रा. चंद्रशेखर भारती यांचे हस्ते करण्यात आले.