मेट्रो पुलाखाली बेकायदा वाहनतळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेट्रो पुलाखाली बेकायदा वाहनतळ
मेट्रो पुलाखाली बेकायदा वाहनतळ

मेट्रो पुलाखाली बेकायदा वाहनतळ

sakal_logo
By

खारघर, ता. ३० (बातमीदार) : भारती विद्यापीठाकडून उत्सव चौकाकडे; तर खारघर सेक्टर १९ पासून ३४ आणि ३५ मधील मेट्रो पुलाखाली दुतर्फा बेकायदा वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या रस्त्याला वाहन तळाचे स्वरूप आल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
खारघर सेक्टर १९ मधील रिलायन्स फ्रेश मॉलकडून रामशेठ पब्लिक स्कूलकडे जाणाऱ्या आणि सेक्टर २७ एनएमआयएमएस महाविद्यालयाकडून सेक्टर ३४ कडे जाणाऱ्या मेट्रो पुलाखाली सिडकोने रस्त्याच्या दोन्ही बाजूने तीन लेनचा रस्ता तयार केला आहे. एका लेनचा वापर दुकानदार वाहनासाठी मध्यभागी एक लेन सोडून तिसऱ्या लेनवर रस्त्याच्या कडेला दुकाने, हॉटेल तसेच बँक आहेत. विशेषतः दुकान मालक रस्त्याच्या कडेला वाहने उभी करतात. याशिवाय जवळपासच्या इमारतीत वास्तव्यास असणारे नागरिक स्वतःच्या तर काही जन टूर्सच्या गाड्या आणि अवजड वाहने मेट्रो पुलाखाली पिलरला लागून उभी करतात. त्यामुळे तीनपैकी केवळ एकच लेन वाहन चालकांसाठी उपलब्ध असते. त्यात रस्त्यावरून दिवसभर खारघर, तळोजा, ठाणे, मुंब्रा आणि नावडे परिसरातील खासगी वाहने तसेच एनएमएमटी बस धावतात. त्यामुळे एकेरी लेनवरून वाहन चालवताना वाहनचालकांना त्रास होत आहे.
--------------------------------------------
स्थानिकांच्या मागणीकडे कानाडोळा
- खारघर वाहतूक विभागाने बेकायदा वाहनांवर कारवाई करून मेट्रो पुलाखालील रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करून रस्ता खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे मेट्रो पुलाखाली उभ्या असलेल्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करून हा रस्ता मोकळा करावा, या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- उत्सव चौकाकडून भारती विद्यापीठकडे तसेच सेक्टर ३४ कडून पेठपाडा मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या मेट्रो पुलाखाली गॅरेज व्यावसायिक अनेक दिवसांपासून रस्त्यावरच वाहने उभी करून दुरुस्तीचे काम करीत असतात. रस्त्यावर वाहने दुरुस्ती केली जात असल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
---------------------------------
मेट्रो पुलाखालील रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याची तक्रार केली आहे. घटनास्थळी पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल.
- योगेश गावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, खारघर