Wed, Sept 27, 2023

महापालिका मुख्यालयावर गुरुवारी धडक
महापालिका मुख्यालयावर गुरुवारी धडक
Published on : 30 May 2023, 12:53 pm
वसई, ता. ३० (बातमीदार) : वसई, विरारमधील नागरिकांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागातर्फे गुरुवारी (ता. १ जून) सकाळी १० वाजता महापालिकेच्या मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिकेला स्थापन झाल्यावर १४ वर्षे पूर्ण होत आहेत, तरीही मूलभूत समस्या रखडल्याने नागरिकांचे हाल होत आहे. वसई, विरार शहराचे कोलमडलेले नियोजन यासह अन्य समस्या नागरिकांना भेडसावत आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पालिकेला जाब विचारण्यासाठी धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांनी सांगितले.