हल्ला करुन दीड लाखांची रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हल्ला करुन दीड लाखांची रोकड लंपास
हल्ला करुन दीड लाखांची रोकड लंपास

हल्ला करुन दीड लाखांची रोकड लंपास

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३० : चाकूचा धाक दाखवून मारहाण करत बारमालकाला लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. हल्लेखोरांनी दीड लाख रुपये हिसकावून पोबारा केला. कल्याण पूर्वेतील हाजी मलंग रोडवर ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या बार मॅनेजर भीम सिंह यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कल्याण पूर्वेत राहणारे भीम सिंह हे कशिश बार अॅण्ड रेस्टॉरंट येथे मॅनेजरचे काम करतात. रविवारी रात्री त्यांनी एक लाख ६५ हजाराची रोकड बार बंद केल्यानंतर सोबत घेऊन ते दुचाकीने घरी निघाले होते. रात्री २.३० च्या सुमारास काकाच्या ढाब्याजवळ आल्यानंतर अचानक दोघे इसम त्यांच्या पाठीमागून पळत आले. काही समजण्याच्या आत त्यांनी भीम यांच्या डोक्यात धारदार वस्तूने वार केले. या हल्ल्यात भीम हे दुचाकीसह खाली पडले. त्यांना जबर मारहाण करत दोघांनी त्यांची दुचाकी तसेच दुचाकीमधील एक लाख ६५ हजाराची रोकड घेऊन पळ काढला. भीम यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोर हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून त्या अनुषंगाने पोलिस हल्लेखोरांचा तपास करीत आहेत.