भिवंडीत वीजचोरी प्रकरणी पिता-पुत्रांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत वीजचोरी प्रकरणी पिता-पुत्रांवर गुन्हा
भिवंडीत वीजचोरी प्रकरणी पिता-पुत्रांवर गुन्हा

भिवंडीत वीजचोरी प्रकरणी पिता-पुत्रांवर गुन्हा

sakal_logo
By

भिवंडी, ता. ३१ (बातमीदार) : तालुक्यातील दापोडा गावात घरगुती वापरासाठी केलेली वीजचोरी टोरंट पॉवरच्या भरारी पथकाने उघडकीस आणली असून १ लाख ६९ हजारांची वीजचोरी प्रकरणी शांतीनगर पोलिस ठाण्यात पिता-पुत्रावर वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडीत वीज चोरांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्याअंतर्गत टोरंट कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक श्रीकांत गणपुरम यांनी दापोडा परिसरातील स्मशानभूमी समोरील घर क्रमांक २०५ वर छापा टाकला असता टोरंटच्या केबलला अनधिकृतपणे जोडणी करून वीजचोरी करीत असल्याचे उघडकीस आले. २८ जानेवारी २०२२ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत ८२६६ युनिटचा वापर करून १ लाख ६९ हजार ४३८ रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आल्याने टोरंट पॉवरच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी घरमालक रमेश पाटील आणि नीलेश पाटील यांच्याविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राज माळी करीत आहेत.