Wed, October 4, 2023

पंजाब मेलही १११ वर्षांची
पंजाब मेलही १११ वर्षांची
Published on : 31 May 2023, 4:11 am
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : पंजाब-महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणाऱ्या ‘पंजाब मेल’ या सर्वांत जुन्या एक्स्प्रेसलाही १११ वर्षे पूर्ण झाली आहेत. पंजाब मेल किंवा पंजाब लिमिटेड ट्रेन १ जून १९१२ रोजी सुरू झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाब लिमिटेड ही ब्रिटिश भारतातील सर्वात वेगवान रेल्वे होती. १९१४ पासून या रेल्वेचे बॉम्बे व्हीटी (आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई) येथून प्रस्थान व आगमन होऊ लागले. त्यानंतर ही गाडी पंजाब लिमिटेडऐवजी ‘पंजाब मेल’ म्हणून ओळखली जाऊ लागली.