ख्रिस्ती धर्मियांकडून एकात्मतेचा संदेश

ख्रिस्ती धर्मियांकडून एकात्मतेचा संदेश

नेरूळ, ता. १ (बातमीदार)ः आर्क फाऊंडेशनमार्फत ख्रिस्ती धर्मीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केले जात आहे. याच अनुषंगाने नेरूळ येथे नुकतीच या संस्थेची १३ वी सभा पार पडली. यावेळी राज्यभरात ख्रिस्ती बांधवांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात एकजूट दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
२०१७-१८ पासून आर्क फाऊंडेशन विविध कार्यक्रम करत आहे. राज्यातील ४६,००० हून अधिक चर्च आहेत. त्यापैकी आर्क फाऊंडेशनने २२ जिल्ह्यात जाऊन लोकांना संघटित केले आहे. नवी मुंबईतील आर्क फाऊंडेशनची ही १३ वी सभा आहे. या सभेला मुंबईतील पास्टर्स आणि चर्चेस प्रोटेस्टन्स, तसेच ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. यावेळी राज्यात अनेक ठिकाणी ख्रिस्ती धर्मीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे; परंतु त्या विरोधात सरकार कोणताही कारवाई करत नसल्याने आर्क फाऊंडेशनच्यावतीने एकजुटीचा संदेश दिला जात आहे.
--------------------------------------
ख्रिस्ती धर्मियांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे. हा अन्याय सरकारने कुठेतरी रोखावा, तसेच ख्रिस्ती बांधवांनी चर्चेला जावेच; परंतु प्रथम मतदान करावे, असे आवाहन केले आहे.
- बबन कांबळे, अध्यक्ष, आर्क फाऊंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com