Mumbai Water : मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचे टेन्शन कायम! २५ दिवस पुरेल एवढेच पाणी mumbai drinking water tension continue water shortage | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Supply
मुंबईकरांना २५ दिवस पुरेल एवढेच पाणी

Mumbai Water : मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचे टेन्शन कायम! २५ दिवस पुरेल एवढेच पाणी

मुंबई - मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील जलसाठ्याने तळ गाठल्याने पालिका प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईला वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात धरणांमधून पाणीपुरवठा होतो. सध्या या सातही धरणांमध्ये केवळ १२.७६ टक्के साठा शिल्लक असून, तो २५ दिवस पुरेल इतकाच असल्याची माहिती पालिकेच्या जलअभियंता विभागाने दिली.

जून महिना सुरू झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दमदार पावसाचे वेध लागले आहेत; परंतु हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचे टेन्शन कायम आहे. आपत्कालीन परिस्थितीत राज्य सरकार राखीव पाणी साठ्याच्या वापरास परवानगी देते. पालिकेने या राखीव पाणीसाठ्यासाठी सरकारकडे मागणीही केली आहे; परंतु सरकारने अद्याप त्याला परवानगी दिलेली नाही. भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणांतील राखीव जलसाठा वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी सरकारला पत्र पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेच्या जलभियंता विभागाने दिली.

धरणांनी गाठला तळ

मोडक सागर : २८.८३ टक्के

तानसा : २५.०६ टक्के

मध्य वैतरणा : १०.६७ टक्के

भातसा : ११.१९ टक्के

विहार : २७.९० टक्के

तुळशी : ३२.१८ टक्के

धरणांनी गाठला तळ

  • मोडक सागर : २८.८३ टक्के

  • तानसा : २५.०६ टक्के

  • मध्य वैतरणा : १०.६७ टक्के

  • भातसा : ११.१९ टक्के

  • विहार : २७.९० टक्के

  • तुळशी : ३२.१८ टक्के