Thur, October 5, 2023

ज्येष्ठाच्या अवयवदानातून तीन जणांना जीवदान
ज्येष्ठाच्या अवयवदानातून तीन जणांना जीवदान
Published on : 1 June 2023, 2:04 am
मुंबई, ता. १ : मुंबईत यंदाच्या वर्षातील १८ वे यशस्वी अवयवदान पार पडले. मेंदूमृत व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आल्याने तीन जणांना जीवदान मिळाले आहे. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयामध्ये ७० वर्षीय पुरुषाचा ३० मे रोजी उपचारादरम्यान मेंदूमृत झाला. या वेळी डॉक्टर, रुग्णालय प्रशासन आणि अवयवदान समन्वय समितीने मेंदूमृत व्यक्तीच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत माहिती दिली. नातेवाईकांनी अवयवदान करण्याची तयारी दाखवल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने कार्यवाही पूर्ण करत अवयवदानाची प्रक्रिया राबवली. त्यानुसार मेंदूमृत व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान करण्यात आले. या अवयवदानामुळे तीन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.