मलनि:सारणाच्या कामांना वेग येणार

मलनि:सारणाच्या कामांना वेग येणार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १ : मुंबईत आगामी काळात मलनिःसारणाची कामे मोठ्या संख्येने हाती घेतली जाणार आहेत. ही कामे करण्यापूर्वी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील जमिनीचे संरेखन सर्वेक्षण (अलाईनमेंट सर्व्हे) आणि भौगोलिक तांत्रिक विश्लेषण (जीओ टेक्निकल ॲनालिसिस) करण्यात येत आहे. यामुळे मलनि:सारण प्रकल्पातील अडथळे दूर होऊन कामे वेळेत आणि वेगाने पूर्ण होऊ शकतील, असा विश्वास पालिका मलनिःसारण विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबई महानगरामध्ये सुमारे दोन हजार २६ किलोमीटर लांबीचे मलनि:सारण वाहिन्यांचे जाळे आहे. पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे वेगाने सुरू आहेत. मलनि:सारण वाहिन्या नसलेल्या ठिकाणी नवीन मलनि:सारण वाहिन्या टाकणे आणि वाहिन्यांचे अवर्धन करण्याची कामे प्रकल्पाच्या उपप्रमुख अभियंता (नियोजन व संकल्प चित्रे) यांच्यामार्फत केली जात आहेत.

पालिकेने यंदाच्या वर्षी विकास आराखड्यातील रस्ते, विद्यमान रस्त्यालगत मलवाहिनी टाकण्याचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्या‍साठी मलनि:सारण वाहिन्या कोणत्या मातीवर टाकायच्या आहे, हे तपासले जाणार आहे. खड्डे, बोअर घेणे, मातीच्या थराचे विश्लेषण करणे आणि मातीची सुरक्षित वहन क्षमता निश्चित करणे आदी कामे यात केली जाणार आहेत. त्यासाठी भौगोलिक तांत्रिक विश्लेषण (जीओ टेक्निकल ॲनालिसिस) आणि संरेखन सर्वेक्षण (टोटल स्टेशन सर्वेक्षण) प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे. ही कामे करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख अभियंता (मलनिःसारण प्रकल्प) संदीप कांबळे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com