फ्युचर जनराली वैद्यकविमा

फ्युचर जनराली वैद्यकविमा

मुंबई, ता. १ ः आपल्या नव्या आरोग्य विमा पॉलिसीत फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनीने ग्राहकांना वीस पर्याय दिले आहेत. आरोग्य विमा पॉलिसीत आपल्याला हवे ते पर्याय मिळाल्यास त्या पॉलिसीला लोक प्राधान्य देतील, असे एका सर्वेक्षणात समोर आले होते. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

डी.आय.वाय. हेल्थ या वैद्यक विमा पॉलिसीत सतरा वेगवेगळी वैशिष्ट्ये असून त्याखेरीज वीस पर्यायी विमाछत्रे आहेत. यात एकत्रित बोनस वाढ किंवा विमाछत्र सहापट वाढवण्याचा पर्याय, अपघात आणि मोठ्या आजारांवरील विमाछत्रात वाढ, बिगर वैद्यकीय खर्चाची तरतूद, अपघाती मृत्यूसाठी विमाछत्र, पाच लाखांवरील विमाछत्रासाठी ओपीडी खर्चाचे संरक्षण, लसीकरण आणि तपासणी खर्चाची तरतूद, कुटुंबातील पंधरा सदस्यांचा समावेश करण्याचा पर्याय आदी तरतुदी आहेत. तसेच बाळंतपणाच्या खर्चासाठी विमा, नवजात बाळाचे संरक्षण, रुग्णवाहिकेचा खर्च आदी पर्यायही आहेत. ग्राहकांना पर्याय देणारी ही विमा पॉलिसी त्यांच्यासाठी अत्यंत सोयीस्कर आहे असे फ्युचर जनरलीचे एम. डी. व सीईओ अनुप राऊ म्हणाले.

दरम्यान, आपल्या इच्छेनुसार विमा पॉलिसीच्या अटी असल्यास आपण त्या पॉलिसीला प्राधान्य देऊ, असे फ्युचर जनरलीने केलेल्या सर्वेक्षणात ग्राहकांनी सांगितले होते. हवे तर तशा पॉलिसीसाठी आपण जास्त प्रीमियम देखील त्यापोटी देऊ, असेही ८० टक्के ग्राहकांनी सांगितले. देशातील १४ शहरांमधील २५ ते ४५ वयोगटातील पंधराशे ग्राहकांमधून हे सर्वेक्षण करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com