Wed, Sept 27, 2023

उत्तन समुद्रकिनारी शीर नसलेला महिलेचा मृतदेह
उत्तन समुद्रकिनारी शीर नसलेला महिलेचा मृतदेह
Published on : 2 June 2023, 1:35 am
भाईंदर, ता. २ (बातमीदार) : उत्तन येथील पातान बंदर भागात समुद्रकिनाऱ्यावर शुक्रवारी (ता. २) सकाळी एका बॅगेत महिलेचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला. सकाळी आठच्या सुमारास स्थानिकांनी ही बॅग पाहिल्यानंतर त्याची माहिती उत्तन सागरी पोलिसांना दिली. समुद्रकिनारी सापडलेल्या बॅगेत दोन तुकडे केलेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह २५ ते ३० वर्षे वयाच्या महिलेचा असून मृतदेहाच्या डाव्या हातावर त्रिशूळ व ओम चित्र असलेला टॅटू गोंदवलेला आहे. मृतदेह असलेली बॅग समुद्राच्या पाण्यातून वाहून आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. २५ ते ३० वर्षीय महिला हरवली असल्यास अथवा मृतदेहासंदर्भात कोणती माहिती असल्यास उत्तन सागरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे यांनी केले आहे.