Sun, Sept 24, 2023

सहा वर्षांपासून वॉण्टेड आरोपी अटकेत
सहा वर्षांपासून वॉण्टेड आरोपी अटकेत
Published on : 2 June 2023, 5:05 am
अंधेरी, ता. २ (बातमीदार) : पुण्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश देण्याची बतावणी करून एका वयोवृद्धाची साडेसतरा लाख रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या एका वॉण्टेड आरोपीस सहा वर्षांनी आंबोली पोलिसांनी अटक केली. सुदीप शामा चक्रवती असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. सुब्रतोकुमार साहा हे वयोवृद्ध दहिसर येथे राहत असून ते एमटीएनएल खात्यातून निवृत्त झाले आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांची फसवणूक झाली होती.