Thur, October 5, 2023

घरात अडकलेल्या दोघांची सुटका
घरात अडकलेल्या दोघांची सुटका
Published on : 3 June 2023, 9:34 am
ठाणे, ता. ३ (वार्ताहर) : टेंभीनाका परिसरातील आनंदनाथ इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील एका घराचा मुख्य दरवाजा लॉक झाल्याने दोन वयोवृद्ध अडकल्याची घटना बुधवारी घडली. याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यानंतर त्यांनी बचावकार्य राबवत या दोन्ही वृद्धांची सुटका केली. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. राजाराम पाटील (८३), राजश्री पाटील (८०) अशी अडकलेल्या वृद्धांची नावे आहेत.