Wed, October 4, 2023

राऊत यांच्या विरोधात युवासेनेचे जोडे मारो आंदोलन
राऊत यांच्या विरोधात युवासेनेचे जोडे मारो आंदोलन
Published on : 3 June 2023, 2:38 am
मुंबई, ता. ३ : शिवसेनेच्या आमदार, खासदार व नेत्यांबद्दल अपशब्द वापरणारे खासदार संजय राऊत यांचा आज शिवसेना युवा कार्यकारिणी सदस्य राज प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथे जोडे मारून जाहीर निषेध करण्यात आला. पत्रकारांसमोर थुंकून गैरवर्तन केल्याबद्दल, तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा अवमान केल्याबद्दल राऊत यांचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेच्या विभाग क्रमांक एकचे कार्यकर्ते, युवा सेनेचे कार्यकर्ते, तसेच महिला शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यापुढे संजय राऊत यांनी आपल्या वागण्यात सुधारणा केली नाही तर जनताच त्यांना प्रत्यक्ष जोडे मारेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. शिक्षक नेते शिवाजी शेंडगे यावेळी उपस्थित होते.